ठाकरे, शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने पुणे :निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा काल निर्णय घेतल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा युद्ध पुन्हा सुरू झाला आहे. आज तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आणि शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या संवादानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले आहे. यानंतर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला पुण्यातील पत्रकार भवन येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने दोघांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.
कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी :पुण्यातील पत्रकार भवनाच्या बाहेर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळाली.आज तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर येत शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर शिवसैनिक हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. निम का पत्ता कडवा है एकनाथ शिंदे भडवा है अशा घोषणाबाजी यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी दिल्या.
जरी धनुष्य नेला तरी मनुष्य ठाकरे यांचा सोबत :या घोषणाबाजी आधी शिवसैनिकांनी पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात केले. या आंदोलनात जरी धनुष्य नेला तरी मनुष्य ठाकरे यांचा सोबत असून येणाऱ्या काळात आम्ही शिंदेंना त्यांची जागा दाखवू असा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी केला आहे. यावेळी शहराध्यक्ष गजानन थरकुडे म्हणाले की, काल जो निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे, तो आयोग्य असून आज जरी चिन्ह आणि पक्षाचा नाव गेले असले तरी आम्ही त्यांना येत्या निवडणुकीच्या काळात त्यांची जागा दाखवून देऊ असे ते म्हणाले.
घोषणाबाजी चुकीची :यावेळी शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले की, काल जो निर्णय देण्यात आला आहे. त्याच आम्ही स्वागत करतो. फक्त महापालिका नव्हे तर संपूर्ण राज्यात आत्ता शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आज जी घोषणाबाजी झाली ती चुकीची असून आमचे पाचच लोक भारी असल्याचे यावेळी भानगिरे यांनी सांगितले.
हेही वाचा -Uddhav Thackeray Criticized Shinde Group: शिवसेनेला कोणीही संपवू शकत नाही; गद्दारांना धडा शिकवणारच; उद्धव ठाकरेंचा निर्धार