महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uday Samant Car Attack : उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना कोर्टात हजर करणार - the arrested Shiv Sainiks will be produced in court

काल रात्री पुण्यातील कात्रज चौकात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर,हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी (In connection with the attack on Uday Samant) पाच जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना (Shivsainik) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथून, ससून रुग्णालयात नेण्यात आले. थोड्याच वेळात अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना कोर्टात (the arrested Shiv Sainiks will be produced in court) हजर करणार आहे.

Uday Samant Car Attack
उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याप्रकरण

By

Published : Aug 3, 2022, 12:48 PM IST

Updated : Aug 3, 2022, 1:15 PM IST

पुणे: शिवसेनेचे बंडखोर आमदार माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर, पुण्यातील कात्रज चौकात हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी (In connection with the attack on Uday Samant) शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना (Shivsainik) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथून, ससून रुग्णालय येथे नेण्यात आले. थोड्याच वेळात अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना कोर्टात (the arrested Shiv Sainiks will be produced in court) हजर करण्यात येणार आहे.


शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची काल कात्रज चौकातील सभा झाल्यानंतर, तेथून काही कार्यकर्ते जात होते. त्यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांची कार कार्यकर्त्यांना दिसली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत, गाडीची काचदेखील फोडली. या घटनेनंतर उदय सामंत यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी रात्रभर छापेमारी करीत शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना अटक केली आहे.

प्रतिक्रीया व्यक्त करतांना शिवसेना शहर संघटिका कल्पना थोरवे



या अटकेमुळे येणार्‍या काळात शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांमध्ये शहर प्रमुख संजय मोरे, सभा आयोजक राजेश पळसकर, चंदन साळुंखे, सुरज लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, या हल्ल्यात शिवसैनिक सहभागी नाहीत,असे सपष्टीकरण उदय सामंत यांनी मिडीया पुढे दिले.

तसेच हा कार्यक्रम सुरु असतांना जी लोक व्यासपीठावर हजर होती. त्यांनाच नंतर पोलीसांनी अटक केली. खरे आरोपी कोण हे पोलीसांनी शोधुन काढायला हवे. ही अटक पुर्णपणे बेकायदेशीर आहे, असे मत अटक करण्यात आलेले अॅड. थोरवे यांच्या पत्नी व शिवसेना शहर संघटिका कल्पना थोरवे यांनी मांडले.

काय होते प्रकरण : माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज चौकात हल्ला केला आहे. यामध्ये गाडीची करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिंदे गटात सामील झालेले उदय सावंत हे देखील होते. हडपसर येथील कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री हे आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील घराकडे जात असताना उदय सावंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करत गाडीची तोडफोड केली आहे. यावेळी कात्रज चौकात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फोडली आहे.

हेही वाचा :Neelam Gorhe on uday samant attack : खोटे आरोप करून शिवसेनेला बदनाम करू नका - नीलम गोऱ्हे

Last Updated : Aug 3, 2022, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details