पुणे - भीमाशंकर-राजगुरुनगर रोडवरील चास गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेने संपूर्ण गावाला ठार मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
गावठी अवैध दारू विक्रेत्या महिलांची संपूर्ण गावाला ठार मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल - अवैध दारूविक्री
चास गावात दारुबंदी असतानाही एक महिला या गावात बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू विक्री करत आहे.
चास गावात दारुबंदी आहे. मात्र, या गावात एक महिला बेकायदेशीरित्या हातभट्टीची दारू विक्री करत आहे. त्यामुळे गावातील महिला आणि तरुण या महिलेला जाब विचारायला गेले. यावेळी त्यांनी गुत्त्यावरील दारूचे कॅन फोडून दारू रत्त्यावर ओतली. या घटनेमुळे दारू विक्री करणार्या महिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी संपूर्ण गावाला ठार मारुन टाकण्याची धमकी दिली.
घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात बेकायदेशीर दारू विक्रीसाठी कोणा-कोणाला पैसे दिले जातात याचा उलगडाच होत आहे. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण गावामध्ये दहशतीचे वातावरण असून पोलिसांच्या भूमिकेकडे त्यांचे लक्ष लागले आहे.