पुणे - मंचर शहरातील पिंपळगाव फाट्यावर अवैधरित्या गुटख्याची विक्री केली जात होती. या ठिकाणी मंचर पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून जवळपास ७० हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी जगदीश सोळंकी याला अटक करण्यात आली.
पुण्यातील मंचरमध्ये अवैध गुटखा जप्त, एकाला अटक - गुटखा
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भैरव ट्रेडर्स येथे मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी छापा टाकला असता विविध कंपन्यांचा अवैध गुटखा आढळून आला. याप्रकरणी मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -भारत-अमेरिका मैत्रीचा नवा अध्याय; शस्त्रसामुग्री खरेदी करारावर होणार सह्या
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भैरव ट्रेडर्स येथे मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी छापा टाकला असता विविध कंपन्यांचा अवैध गुटखा आढळून आला. याप्रकरणी मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरुर तालुक्यात पानटपरी, दुकानांमध्ये सर्रास गुटखा विकला जातो. यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न आता स्थानिक विचारत आहेत.