महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरेश गोरेंना घरी बसवण्यासाठीच आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवणार - दिलीप मोहिते पाटील

शिवसेनेच्या नेत्यांच्या दबावामुळे मला हिंसक आंदोलन प्रकरणात तुरूंगात जावे लागले, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश गोरेंवर टीका केली.

सभेत बोलताना दिलीप मोहिते पाटील

By

Published : Oct 1, 2019, 11:40 PM IST

पुणे -राज्यभर गाजलेल्या चाकण मराठा आंदोलन हिंसाचारात मला माझा भाऊ गमवावा लागला. शिवसेनेच्या नेत्यांच्या दबावामुळे मला हिंसक आंदोलन प्रकरणात तुरुंगात जावे लागले, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश गोरेंवर टीका केली. राजगुरूनगरयेथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश गोरेंवर टीका केली


शिवसेना नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांनी माझ्यावर एक वर्षानंतर खोटा गुन्हा दाखल केला. या गोष्टीचा धक्का सहन न झाल्याने मला माझ्या मोठ्या बंधूला गमवावे लागले. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरेंना घरी बसवण्यासाठीच आपण आपल्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक लढवणार असल्याचे, दिलीप मोहितेंनी सांगितले.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : कर्जतचे आमदार सुरेश लाड यांचा निवडणूकीस 'ना', रायगडात राष्ट्रवादीला धक्का

खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मोहिते यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. राजगुरूनगर शहरातून वाजत-गाजत बैलगाडीमधून रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details