पुणे- जागा वाढवून मिळण्याबाबत आमचा विचार झाला नाही तर आमच्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.
जागा न मिळाल्यास आमच्यासमोर इतर पर्याय, रामदास आठवले यांचा भाजपला इशारा - उद्धव ठाकरे
जागा वाढवून मिळण्याबाबत आमचा विचार झाला नाही तर आमच्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत, असा इशारा रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.
आठवले म्हणाले, की भाजप आणि शिवसेनेची युती झाली ही समाधानाची बाब आहे. अनेक दिवसापासून माझीही हीच इच्छा होती. परंतु, ती झाल्यानंतर भाजप आणि सेना आरपीआयला विसरून जातील असे वाटले नव्हते. आरपीआयला सोबत घेतल्याशिवाय निवडून येणे शक्य नाही. राजकारणात माझ्या नावाला वजन आहे आणि मी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणारे महाराष्ट्रात अनेक जण आहेत.
आम्ही कधी तक्रारही करत नाही किंवा मित्र पक्षाची बदनामी करत नाही. याउलट उद्धव ठाकरे यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. अनेक धोरणाविरोधात भूमिका घेतली. असे असतानाही त्यांना एक जागा वाढून मिळाली आणि आमचा अजूनही विचार केला नाही. त्यामुळे जर आमचा विचार झाला नाही तर आमच्यासाठी सर्व पर्याय उपलब्ध असल्याचा इशाराही आठवले यांनी दिला.