राजगुरूनगर (पुणे)- राजगुरनगर शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोणीही गरीब गरजू उपाशी झोपू नये म्हणून येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन, जैन श्रावक संघाच्या माध्यमातून राजगुरूनगर बसस्थानकात रोज दोनशे नागरिकांना मोफत जेवणाची सोय आजपासून (दि.१० एप्रिल) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन अन् जैन श्रावक संघाच्या माध्यमातून दोनशे नागरिकांना जेवण - Jain Shravak Sangh news
राजगुरूनगर शहरात सुरुवातीपासून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम सुरु करुन दररोज दोनशेपेक्षा जास्त नागरिकांना जेवणाची घरपोच सुविधा उपलब्ध दिली आहे. त्यानंतर शिवभोजन थाळी शहरात सुरु झाली असून त्यातून शंभर लोकांना एकवेळचे जेवण दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शरद भोजन योजनेच्या माध्यमातून वयोवृद्ध, दिव्यांग निराधांना दोन वेळेचे जेवण अंगणवाडी सेविकांमार्फत दिले जात आहे. आजपासून हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन, जैन श्रावक संघाच्या माध्यमातून दोनशे नागरिकांना जेवणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
जेवणासाठी रांगेत उभे असलेले नागरिक
Last Updated : Apr 10, 2020, 8:45 PM IST