पुणे- वारजे परिसरात एकाने क्षयरोगामुळे ग्रस्त असलेल्या पत्नीचा गळा दाबून आणि जमिनीवर तिचे डोके आपटून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १ जूनला घडली. सोनाली बाबू शेख (वय ३०) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती बाबू राजू शेखला (वय ३४) अटक केली आहे.
डोके जमिनीवर आपटून आजारी पत्नीचा खून, पतीला बेड्या - ससून रूग्णालय
क्षयरोगामुळे ग्रस्त असलेल्या पत्नीचा गळा दाबून आणि जमिनीवर तिचे डोके आपटून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली बाबू शेख (वय ३०) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती बाबू राजू शेखला (वय ३४) अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील सर्व्हिस रस्त्यावर एक महिला पडली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.
मृत सोनाली शेख हिला टीबीचा आजार होता. त्यावर ती ससून रुग्णालयात उपचारही घेत होती. शुक्रवारीच ती घरी परत आली होती. ती घरी येताच नवरा-बायकोत वाद झाला आणि बाबू शेख याने तिला रस्त्यावरच मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर बाबूने तिचा गळा दाबून आणि डोके जमिनीवर आपटून खून केला. दरम्यान, याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शेखर शिंदे करीत आहेत.