महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळजनक.. पत्नी झोपेत असताना डोक्यात हातोड्याने घाव घालून हत्या; दोन वर्षापूर्वी झाला होता प्रेमविवाह

पिंपरी-चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी उघडकीस आली. चारित्र्याच्या संशयातून हे कृत्य घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Husband murder of wife
Husband murder of wife

By

Published : Sep 6, 2021, 5:15 PM IST

पिंपरी-चिंचवड -पिंपरी-चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी उघडकीस आली. सरला साळवे असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे तर आरोपी पती विजयकुमार साळवे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सरला आणि विजयकुमार यांचा प्रेमविवाह झाला होता. ते दोघेही विदर्भातील असून ते कामानिमित्त मोशी येथे राहत होते. प्रेमविवाहानंतर सुखी संसाराची सुरुवात झाली. मात्र, काही दिवसातच दोघांमध्ये संशयाची पाल चुकचुकली. त्यावरून विजयकुमार आणि सरला यांच्यात वाद होऊ लागला. सरला यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन विजयकुमार वाद घातल होता.

हे ही वाचा -..तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

डोक्यात हातोड्याने वार करून अंगावर चाकूने वार -


रविवारी रात्री सरला झोपल्या असता विजयकुमार याने तिच्या डोक्यावर हातोड्याने जोरदार प्रहार करत सरलाचा खून केला. त्यानंतर चाकूने सरलाच्या अंगावर वार केले. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान विजयकुमार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा -संघावर टीका, मात्र शिवसेनेची नापसंती... जावेद अख्तरांनी तालिबानची संघाशी केलेली तुलना शिवसेनेला अमान्य

ABOUT THE AUTHOR

...view details