महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुळशी; ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरु नका; पती-पत्नीला ठार मारण्याची धमकी

ग्रामपंचायत निवडणूकीचा फॉम भरू नका म्हणत पती- पत्नीला भर रसत्यात अडवत जीव मारण्याची धमकी देणारी घटना मुळशीतील खेचरे गावात घडली.

Husband and wife threatened to kill in mulsh
ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरु नका; पती-पत्नीला ठार मारण्याची धमकी

By

Published : Dec 22, 2020, 10:18 AM IST

पुणे-मुळशी तालुक्यातील खेचरे गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरू नये यासाठी पती-पत्नीला तीन जणांनी भर रस्त्यात शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.याप्रकरणी अर्जुन सिद्धू गोरड (वय 36) यांनी फिर्याद दिली असून संतोष धुमाळ, अंकुश तोंडे आणि राहुल रमेश या तिघांविरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भर रसत्यात धमकावले-

रविवारी रात्री फिर्यादी आणि फिर्यादीची पत्नी सारिका हे दुचाकीवरून घरी जात होते. तेव्हा आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. तुम्ही दोघेही ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरू नका आणि ही निवडणूक लढवू नका असे म्हणत दोघांनाही शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. तर दुसर्‍या दिवशी सकाळी आरोपीने फिर्यादीच्या घरासमोर येत फिर्यादीच्या पत्नीला ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरू नको म्हणत शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर गोरड यांनी पोलीसात तक्रार दाखल केली.

ABOUT THE AUTHOR

...view details