महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

HSC result 2023: बारावीचा निकाल ३१ मे रोजी लागण्याची शक्यता-शरद गोसावी

बारावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल 31 मे रोजी लागण्याची शक्यता आहे.

HSC result 2023
बारावीचा निकाल

By

Published : May 17, 2023, 10:51 AM IST

Updated : May 17, 2023, 12:15 PM IST

पुणे : सीबीएसई, आयसीएसई आणि आयएससी बोर्डाने नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. लवकरच या विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे, असे शरद गोसावी यांनी सांगितले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल राज्य शिक्षण मंडळातर्फे मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावी-बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात : बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान पार पडली होती. 14 लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. आता सर्वांनाच निकालाचे वेध लागले आहेत. बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, दहावी-बारावीच्या निकालाचे काम हे अंतिम टप्प्यात आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होईल. तसेच लवकरच या निकालाबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.



बारावीसाठी एकूण विद्यार्थी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) वी ची परीक्षे घेण्यात आली. यंदा या परीक्षेसाठी एकूण 14,57,293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये 7,92,780 विद्यार्थी 6,64,441 विद्यार्थीनी आहेत. एकूण 10,388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. यंदाच्या या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3,195 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

दहावीसाठी एकूण विद्यार्थी : यंदाच्या या परीक्षेत विज्ञान शाखेतून 6,60,780 विद्यार्थी, कला शाखेत 4,04,762, वाणिज्य शाखेत 3,45,532, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) मध्ये 42,959,आणि टेक्निकल सायन्स शाखेत 3261 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण 15,77,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये 8,44,196 विद्यार्थी 7,33,037 विद्यार्थीनी आहेत. एकूण 23,010 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 5033 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. State Examination Board Appeals : बारावीच्या निकालाबाबत समाज माध्यमांवरील अनधिकृत संदेशांवर विश्वास ठेवू नये - राज्य परीक्षा मंडळाचे आवाहन
  2. धक्कादायक... बारावीत नापास झाल्याने युवकाची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या
  3. Zilla Parishad : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी थ्री पॉईंट
Last Updated : May 17, 2023, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details