पुणे- येथील गणेश पेठेत मध्यरात्री एका जुन्या वाड्याची भिंत कोसळली. घराची भिंत पडत असल्याचे लक्षात येताच घरात असलेल्या मायलेकी तत्काळ घराबाहेर पडल्या, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र, घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली.
पुण्यात आणखी एका वाड्याची भिंत कोसळली, मायलेकी थोडक्यात बचावल्या
गणेश पेठेत मध्यरात्री एका जुन्या वाड्याची भिंत कोसळली. घराची भिंत पडत असल्याचे लक्षात येताच घरात असलेल्या मायलेकी वेळीच बाहेर पळाल्याने थोडक्यात बचावले.
मागील काही दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस सुरू आहे. पुण्यातील पेठांमध्ये मोठ्या संख्येने जुने वाडे आहेत. काही धोकादायक वाड्यांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावून खाली करण्यास भाग पाडले तर काही वाड्यांत आजही नागरिक वास्तव्यास आहेत. हे वाडे मातीचे असल्यामुळे पावसात भिजून यांची पडझड होत आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून पुण्यातील जुने वाडे, भिंत कोसळण्याच्या घटना सुरू आहेत. आतापर्यंत चार ते पाच वाडे आणि भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 21 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला होता. तर 9 जण जखमी झाले आहेत.