पुणे- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात निवडणूक काळात जोरदार वाकयुद्ध झाले होते. याच मुद्द्याला धरून बारामतीत बॅनर लावून फडणवीसांना मार्मिक टोला मारला आहे.
'जेवढ राज्य करायचे होते तेवढं केलं... आता राज्य करायची बारी आमची'..बारामतीत बॅनर हेही वाचा -'मुख्यमंत्र्यांना महापुरुषांचा विसर', कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी
'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ऐंशी वर्षाचा पैलवान ठरवेल'
जेवढे राज्य करायचे होते तेवढे केले आता राज्य करायची बारी आमची....महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ऐंशी वर्षाचा पैलवान ठरवेल... तोच होणार कारण कोणी कितीही उड्या मारल्या तरी सगळी सूत्र इथूनच हलतात साहेब... या आशयाचे बॅनर उभारून फडणवीसांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न
मागील महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर तोडगा निघाला आणि या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली आहे.
महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी धक्कातंत्राचा वापर करत अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या काही तासातच पवारांनी आपला निर्णय मागे घेऊन राजीनामा दिला. दरम्यान, अजित पवार यांच्या या निर्णयामुळे बारामतीकरांची द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. अनेक बारामतीकर अजित पवारांच्या निर्णयाचे स्वागत करत होते. तर, काही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत होते. अखेर या सर्व घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांनी चंग बांधला होता व अखंड महाराष्ट्र पिंजून काढत भर पावसात सभा घेऊन भाजपविरोधी वातावरण निमिर्ती केली होती. मात्र, आघाडीला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यावेळी मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत बिनसले आणि युती तुटली. त्यानंतर पवारांनी सेनेशी जुळते घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत सत्तास्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय महाविकासआघाडीच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसून येत आहे.
विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिलेल्या राष्ट्रवादी पक्ष आज सत्तेत आल्याने बारामतीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. या आनंद उत्सवाबरोबरच या बॅनरची बारामतीत जोरदार चर्चा सुरू आहे.