महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहमंत्र्यांनी घेतली 'त्या' आजींची भेट.. साडी चोळी आणि एक लाखांची मदत - पुणे आज्जी व्हायरल व्हिडिओ

राज्याचा गृहमंत्री मला भेटण्यासाठी आला. त्यामुळे मला आनंद झाला. त्यांनी माझी, माझ्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस केली. साडीचोळी आणि एक लाखाचा धनादेश दिला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भरपूर मदत मिळाल्याचे आज्जींनी सांगितले.

home-minister-met-that-grandmother-at-pune
गृहमंत्र्यांनी घेतली 'त्या' आज्जींची भेट..

By

Published : Jul 25, 2020, 8:02 PM IST

पुणे- लाठी काठीच्या खेळातून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या शांताबाई पवार यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी शांताबाईंना साडी चोळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक लाख रुपये किमतीचा धनादेश दिला. यावेळी आज्जींनी गृहमंत्र्यांसमोर लाठी काठीचे खेळही करुन दाखवला. त्यावेळी उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. त्यांना सरकारी योजनेत बसेल तशी मदत शासनातर्फे केली जाईल, असे गृहमंत्र्यानी सांगितले.

यावेळी बोलताना शांताबाई म्हणाल्या, राज्याचा गृहमंत्री मला भेटण्यासाठी आला. त्यामुळे मला आनंद झाला. त्यांनी माझी, माझ्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस केली. साडीचोळी आणि एक लाखाचा धनादेश दिला. व्हिडिओ वायरल झाल्यावर भरपूर मदत मिळाल्याचे आजींनी सांगितले.

दरम्यान, विविध माध्यमांनी दखल घेतल्यापासून आजींवर मदतीचा वर्षाव होत आहे. मात्र तरीही इतके मोठे कुटुंब पोसण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांना दीर्घकालीन मदतीची आणि त्या दृष्टीने कामाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details