पुणे- गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे मी पवार साहेबांना भेटण्यासाठी बारामतीमध्ये आलेलो आहे. उद्या किवा परवा पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाला सुरुवात करणार आहे. गृहमंत्रालय माझ्यासाठी नवीन असले तरी गृह खात्यातील सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांची ८ तारखेला बैठक घेऊन कामकाज करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवार भेट; 'कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करणार प्रयत्न' - Anil Deshmukh Sharad Pawar Meet
गृहमंत्री पद कोणाकडे जाणार यासंदर्भात सर्वत्र चर्चा सुरू होती. सर्वांना वाटते सर्वांना अपेक्षा असते की मी गृहमंत्रीपदासाठी काम करावे. मात्र, साहेबांनी मला ही जबाबदारी दिली. ती जबाबदारी चोखपणे पार पाडेल असे देशमुख म्हणाले.
अनिल देशमुख बारामतीत शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री पद कोणाकडे जाणार यासंदर्भात सर्वत्र चर्चा सुरू होती. सर्वांना वाटते सर्वांना अपेक्षा असते की मी गृहमंत्रीपदासाठी काम करावे. मात्र, साहेबांनी मला ही जबाबदारी दिली. ती जबाबदारी चोखपणे पार पाडेल, असे देशमुख म्हणाले. त्याचबरोबर, राज्यातील पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात येईल. बारामतीच्या पोलीस उपमुख्यालयाचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल. राज्यातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागपूर आणि विदर्भ या भागातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी खास प्रयत्न केले जातील. राज्यातील अबाधित ठेवण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा-यंदा नवा विजेता, 'महाराष्ट्र केसरी'साठी सदगीर विरुद्ध शेळके यांच्यात रंगणार अंतिम लढत