महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोठ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची गरज - ब्रिगेडियर हेमंत महाजन - jaish

मोठ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

ब्रिगेडियर हेमंत महाजन

By

Published : Mar 4, 2019, 9:13 AM IST

Updated : Mar 4, 2019, 9:27 AM IST

पुणे - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. जर त्याचा मृत्यू झाला असेल तर ती चागंली गोष्ट आहे मात्र, मोठ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

हेमंत महाजन

महाजन म्हणाले, की यासंदर्भात दोन दावे समोर आले आहेत. पाहिले म्हणजे तो आपल्या हवाई हल्ल्यात मारला गेला असावा किंवा आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. काश्मिरमध्ये ३ दहशतवादी गट असून, जैश हा त्यातील एक महत्वाचा गट आहे. त्याव्यतिरिक्त लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनही तेथे सक्रिय आहेत. मसूदच्या मृत्यूमुळे त्यांच्या क्षमतेवर मोठा परिणाम होईल. मात्र, या गटांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Mar 4, 2019, 9:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details