पुणे- जिल्ह्यात मध्यरात्रीपासुन पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. त्यामुळे गावागावातील ओढे, नाले दुथडी भरुन वाहु लागले आहेत. शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. तर दुसरीकडे शेतातील पिकांना देखील पाण्याचे प्रमाण जास्त होत चालले आहे.
पुणे जिल्ह्यात मध्यरात्रीपासुन पावसाची जोरदार बँटींग - पुणे-नाशिक महामार्ग
बुधवारी रात्रीपासुन जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यातच पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली होती. तर काही ठिकाणी अपघाताची भीती निर्माण झाली होती.
जोरदार पाऊस
गेल्या आठ दिवसांपासुन काही भागात पाऊस पडत आहे. बुधवारी रात्रीपासुन जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यातच पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुककोंडी होत आहे. तर काही ठिकाणी अपघाताची भिती निर्माण होत आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र आता या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.