पुणे - शहरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे येथील खडकवासला धरणातून विसर्ग वाढला आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील दोन दिवसांपासून पुण्यात दमदार पाऊस सूरु आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्यामुळे आसपास असणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणातील पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. या चारही धरणक्षेत्रात 66 टक्के पाणीसाठा झाला आहे.