पुणे- शहर आणि परिसरामध्ये पावसाची संततधार कायम आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश धरणेही 80 टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. पुणे आणि परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणांमधून नदीत पाणी सोडण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. खडकवासला धरणातून सुरू असलेला 45 हजार 457 क्युसेक पाण्याचा विसर्ग 48 तासानंतरही कायम आहे.
पुण्यात संततधार.. 'खडकवासला'तून 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग 48 तासानंतरही सुरुच - धरणे शंभर टक्के भरली
पुण्यातील नदी परिसरातील तसेच कालव्याच्या परिसरात राहणाऱया नागरिकांना याचा फटका बसला आहे. या नागरिकांना जवळच्या महानगरपालिकांच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. नदीकाठच्या काही सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे पुण्यातील नदी परिसरातील तसेच कालव्याच्या परिसरात राहणाऱया नागरिकांना याचा फटका बसला आहे. या नागरिकांना जवळच्या महानगरपालिकांच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. नदीकाठच्या काही सोसायट्यांमध्येदेखील पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर यांना जोडणाऱ्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन्ही शहरांना जोडणाऱ्या पाच पुलांना पाणी लागल्याने सुरक्षितेसाठी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा फेरा मारून प्रवास करावा लागत आहे.
पुण्यातल्या मुठा नदीला आलेल्या पुरामुळे डेंगळे पुलाजवळील राजीव गांधी वसाहत, तळजाई वसाहत, पेठाच्या परिसरात, कामगार पुतळा तसेच बिबवेवाडी, कात्रजमध्ये काही भागात पाणी शिरले आहे. औंध, बाणेर परिसरातही अनेक ठिकाणी सोसायटीच्या आवारात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.