पुणे :या प्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र पवार यांच्या तक्रारीवरून पुण्यातील समर्थ पोलिसांकडून एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च रोजी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील एका 14 वर्षीय मुलाने मच्छी मार्केटजवळ, लक्ष्मी रोड, नानापेठ पुणे याठिकाणी असताना स्वतःच्या आईच्या मोबाईल फोन वरून इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन समुदायात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट केली. पुण्यात दंगल घडावी हा त्यामागील हेतू होता. आपआपसात द्वेष निर्माण व्हावा या उद्देशाने या मुलाने वादग्रस्त फोटोसेशन केले होते. म्हणून त्याविरुद्ध सरकारतर्फे भादंवि कलम १५३.१५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दंगलबाजांची ओळख पटली : छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपूरमध्ये दंगल उसळली. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी या दंगलीच्या तपासासाठी १२ सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे. सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे मुख्य तपास अधिकारी असून किराडपुरा दंगल प्रकरणाचा सखोल तपास एसआयटी करणार आहे. सात पथके २४ तास संशयितांचा शोध घेतील. या दंगलीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांना अटक केली असून, त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी ४० हून अधिक आरोपींची ओळख पटवली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.