पुणे- हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचे कालचे भाषण ऐकल्यानंतर दुःख झाले. त्यानंतर मी त्यांना अनेकवेळा फोन केला पण त्यांचा फोन लागला नाही. त्यांनी केलेल्या दगाबाजीच्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
हर्षवर्धन पाटीलांनी दगाबाजीच्या आरोपाचे पुरावे द्यावेत - सुप्रिया सुळे - सुप्रिया सुळे
हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचे कालचे भाषण ऐकल्यानंतर दुःख झाले. त्यानंतर मी त्यांना अनेकवेळा फोन केला पण त्यांचा फोन लागला नाही. त्यांनी केलेल्या दगाबाजीच्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
हर्षवर्धन पाटील आणि आमचे आजवर कौटुंबिक संबध आहेत. आम्ही प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यासोबत होतो. त्यांच्यावर कधीच अन्याय केला नाही. त्यांनी काल जे विधान केले ते धक्कादायक असून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण त्यांचा फोन लागत नाही. त्याच बरोबर हर्षवर्धन पाटील यांच्या जागेची अद्याप चर्चा देखील झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आमचे अनेक नेते भाजप आणि सेनेत जात आहे. राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी या पक्षात आल्याचे ते सांगत आहेत. जनतेच्या हितासाठी ते पक्ष बदलत आहेत. एवढे ऐकून तरी मला समाधान मिळत, असल्याचे सांगत पक्षांतर करणार्यांवर सुळे यांनी सडकून टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील पंधरा वर्षात संघर्षच केला आहे. या निवडणुकीत संघर्ष करुन पुन्हा उभा राहिल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वासही सुळे यांनी व्यक्त केला.