महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेरोजगारीतून गुन्हेगारीकडे..!  रुग्णालय बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा उच्चशिक्षीत तरुण गजाआड

स्पर्धेच्या या युगामध्ये उच्चशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि खासगी नोकऱ्या मिळाल्या तरी ते टिकत नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहेत. बेरोजगारीमुळे पैशाची चुणचुणी संसाराचा गाडा ओढण्यासाठी गुन्हेगारी मार्गाकडे वळत आहेत. याची प्रचिती पुण्यात आली आहे. एम.एससी. फिजिक्सचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Feb 27, 2020, 7:47 AM IST

पुणे- तो भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवीपर्यंत शिकलेला. लग्न झाले असून तीन वर्षाची मुलगीही आहे. पण, नोकरी नव्हती. परिणामी जवळ पैसे नव्हते. मग काय पैशासाठी त्याने पुण्यातील एक रुग्णालयच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. अखेर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत या तरुणाला बेड्या ठोकल्या. प्रविण हिराचंद कुंभार (वय 31 वर्षे, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कुंभार हा बारामती तालुक्यातील रहिवासी असून सध्या तो पुण्यात राहतो. एम. एम.एससी. फिजिक्समध्ये त्याचे शिक्षण झाले असून त्याने अनेक खासगी कंपन्यांमध्ये नोकरी केली. पण, कोठेच त्याचा निभाव लागला नाही. गेल्या काही दिवसांपासून तो बेरोजगार होता. त्यामुळे तो नैराश्यात होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने वडिलांकडून पैसे घेतले आणि गोव्याला गेला. तेथे त्याने मोबाईलवर बनावट ई-मेल अकाउंट तयार केले. त्यावरुन त्याने प्रथम 31 जानेवारी व त्यानंतर 7 फेब्रुवारीला पुण्यातील नोबेल रुग्णालयाला ई-मेल करुन 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर बॉम्बने संपूर्ण रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, अशाप्रकारचा ई मेल आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण रुग्णालय पिंजून काढले. पण, त्यांना काहीही आढळले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील ई-मेलचे तांत्रिक विश्लेषण केले असता तो गोव्याहून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी गुगलशी संपर्क साधून अधिक माहिती घेत वाई येथून प्रविण कुंभार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपासासाठी त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

असुरक्षित वायफायचा केला वापर

अनेक जण वाय फाय कनेक्शन घेतात त्याचा पासवर्ड सुरक्षित नसतो. प्रविण याने गोव्यातून इंटरनेटची सुरक्षा भेदून बनावट मेल आयडी तयार केला. त्याने महाराष्ट्र व गोव्यात फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे विना पासवर्ड वाय फाय व हॉट स्पॉटचा शोध घेऊन त्याचा वापर केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी सायबर पोलिसांना संबंधित कंपनीकडून तातडीने माहिती प्राप्त करुन घेण्यात अनेक अडचणी आल्या.

हेही वाचा -अबब...! दुचाकीस्वाराने 108 वेळा भंग केले वाहतूकीचे नियम 'इतका' भरला दंड

ABOUT THE AUTHOR

...view details