पुणे - डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हॅकॅथॉन स्पर्धेचा अंतिम सामना पुण्यात पार पडला . केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यात रंगला डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत हॅकॅथॉन स्पर्धेचा अंतिम सामना
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सॉफ्टवेअरशी संबंधित हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचा अंतिम सामना पुण्यात पार पडला. देशभरातील अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले. यातील प्रत्येक संघामध्ये ६ अभियंत्यांचा समावेश होता.
ही स्पर्धा मुंबईमधील वेलिंगकर इन्स्टिट्यूट, पुण्यामधील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि नागपूरच्या रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय या ३ केद्रांवर झाली. यातील पुण्यामधील केंद्रावर सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये देशभरातील अनेक संघ सहभागी झाले. यातील प्रत्येक संघामध्ये ६ अभियंत्यांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये सॉफ्टवेअरशी संबंधित प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आव्हान स्पर्धकांसाठी ठेवण्यात आले. यासाठी खासगी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आणि मोठ्या कंपन्यांनीही या उपक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या. हा उपक्रम संपल्यानंतर शनिवारी रात्री १० वाजता नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.