पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इमारतीच्या मुख्य गेटवर आज(गुरुवारी) भर पावसात जिम चालकांनी आंदोलन केले. गेल्या पाच महिन्यात जिम बंद ठेऊन किती रुग्ण कमी झाले असा सवाल करत जिम कधी सुरू करण्यात येणार, असे जिम चालकांनी प्रशासनाला आंदोलनाच्या माध्यमातून विचारले आहे. फिटनेस एक्सपर्ट असोसिएशनतर्फे हे आंदोलन करण्यात आले.
जिम चालू करण्यास परवानगी द्या, पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर जिम चालकांचे भर पावसात आंदोलन - फिटनेस एक्सपर्ट असोसिएशन पुणे बातमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडेचार महिण्यापासून जिम बंद असल्याने छोट्या व्यवसायिकांसह जिमचालक, मालक, प्रशिक्षक, कामगार यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, आज पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मुख्य गेटसमोर जिम सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडेचार महिण्यापासून जिम बंद असल्याने छोट्या व्यवसायिकांसह जिमचालक, मालक, प्रशिक्षक, कामगार यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. मात्र, प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे जिम चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, आज पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मुख्य गेटसमोर जिम सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
गेल्या साडेचार महिण्यापासून जिम बंद असल्याने कर्जचे हप्ते भरायचे कुठून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, महिन्याला दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य, जिम भाडे, वीजबिल भरण्यासाठी प्रशासनाने सवलत द्यावी अशा विविध मागण्या यावेळी जिम चालकांनी अतिरिक आयुक्त यांच्याकडे निवेदनामार्फत केल्या. लवकरात लवकर जिम सुरू करातेत असे या निवेदनात प्रामुख्याने म्हटले आहे.