पुणे- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना,आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांची आज पुण्यात बैठक झाली. त्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दिल्याचे पत्रक जाहीर केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. परंतु, स्थानिक रहिवाशी नसल्याच्या कारणावरून त्यांना विरोध होत होता. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मयुरेश अरगडे चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या मतात विभागणी होण्याची शक्यता होती.
हेही वाचा - पिंपरी, चिंचवड अन् भोसरी मतदारसंघात बंडखोरी!