पुणे -जगभर २१ जूनला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी योगासनांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विविध योगासने केली. पुण्यातील खेड तालुक्यात तहसील कार्यालयाकडुन राजगुरुनगर क्रिडा संकुल येथे शासकीय कर्मचारीवर्गासाठी योगा आयोजित करण्यात आला होता. मात्र, योग दिनाकडे शासकिय कर्मचाऱ्यांसह अनेक आधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून योगा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. खेड तालुक्यातील शासकिय कर्मचाऱ्यांसह आधिकारी वर्गाने योग दिनाकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.