पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील लघु उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी एसटी आपल्या दारी हा उपक्रम एसटी महामंडळ राबवत असून राज्याच्या कानाकोपऱ्यात माल पोहोचवला जाणार आहे. कमीत कमी ४ टन आणि जास्तीत जास्त ७ टन मालवाहतूक करता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळ २८ रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारण्यात येणार असून त्यावर १८ टक्के जीएसटी लावला जाणार आहे, अशी माहिती वल्लभनगर विभागाच्या सहाय्यक वाहतूक अधीक्षक पल्लवी पाटील यांनी दिली आहे.
महामंडळाकडून 'एसटी आपल्या दारी' उपक्रम, पिंपरी-चिंचवडमधील शेतकऱ्यांसह उद्योजकांना होणार फायदा
एसटी महामंडळाकडून 'एसटी आपल्या दारी' हा उपक्रम राबवला जात आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालासह औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील लघु उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. एसटी बस २४ तास उपलब्ध असणार असून यासाठी वल्लभनगर डेपोला संबंधित व्यक्तींनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या शेती मालासह औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील लघु उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. एसटी बस २४ तास उपलब्ध असणार असून यासाठी वल्लभनगर डेपोला संबंधित व्यक्तींनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्हाबंदी परराज्यात जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना इतर जिल्ह्यात माल घेऊन जात आला नाही. याच कारणाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर बस निर्जंतुक करण्यात आलेले असून सुरक्षित वाहतूक केली जाणार आहे. जिल्हा बंद असल्याने वाहतुकीला पर्याय म्हणून ही वाहतूक केली जात आहे. अधिक एसटी बसला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महिला अधिकारी पाटील यांनी केले आहे. विशेष म्हणजे रेडझोनमध्ये ही वाहतूक होणार आहे. त्यासाठी समोरील व्यक्ती तयार हवा. एसटी बस माल वाहतूक करू शकतात आणि तो पोहोचवला देखील जातो, असा या मागचा उद्देश आहे.