पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोघांनी व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. यात 2 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम आणि 50 तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने घेऊन अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केला आहे. त्यांचा शोध पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा एकचे अधिकारी घेत आहेत. रवी मेहता (वय 71 वर्षे) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.
भरदिवसा व्यापाऱ्याला रोख रक्कमेसह 50 तोळे सोने लुटले, पिंपरी-चिंचवडमधील घटना - PCMC crime
पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोघांनी व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पिंपरीच्या मुख्य चौकात एका व्यापाऱ्याला अज्ञात दोघांनी भरदिवसा लुटले आहे. रवी मेहता हे मूळचे पंजाब येथील आहेत. मेहता हे सोन्याचे आणि चांदीचे दागिने परराज्यात नेऊन विकतात. पिंपरी-चिंचवड शहरात ते रात्री मुक्कामी आले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 2 लाख 80 हजार रोख रक्कम आणि ५० तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने घेऊन ते चिंचवडला जाणार होते. रवी मेहता पायी पिंपरी चौकात जात होते. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्या हातातील सुटकेस हिसकावली, मेहता यांनी सुटकेस लवकर सोडली नाही. ते काही अंतरावर फरफटत गेले. यात त्यांच्या हाताला मुका मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून अज्ञात चोरांचा पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - कोरेगाव भीमा : शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे 'मॉक ड्रिल'