पुणे -तळी-भंडाऱ्याची उधळण करत तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे जुन्नरवरुन तुळजापुरकडे प्रस्थान झाले.
12 व्या शतकातील राजा रामदेवरायकालीन परंपरा असलेला हा पलंग पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे तयार करण्यात येतो. गणेशोत्सवा दरम्यान १० दिवसांच्या काळात किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथे या पलंगाचा मुक्काम असतो.
तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे जुन्नरवरुन तुळजापुरकडे प्रस्थान हेही वाचा - युती होईल तेव्हा होईल... पुण्यात मात्र शिवसेना इच्छुकाने फोडला प्रचाराचा नारळ
संपूर्ण प्रवासात देवीचा हा पलंग भाविक डोक्यावरून नेतात. ठिक-ठिकाणच्या तिळवन तेली समाजाकडून या पलंगाची व्यवस्था पाहीली जाते. विजयादशमीला पलंग तुळजापुरमध्ये दाखल होईल. विजयादशमी ते कोजागिरी पोर्णिमा या 5 दिवसांच्या काळात तुळजापुरची मुख्य मूर्ति या पलंगावर विश्रांती घेते, अशी मान्यता आहे. मागील वर्षीचा पलंग या वेळी विसर्जित केला जातो.