बारामती (पुणे) - बारामतीत सध्या बोकडाच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा सुरू आहे. बळीराजा हा आपल्या कुटुंबातील सदस्यां इतकाच आपल्या जनावरांवरही प्रेम करतो. याची प्रचिती नुकतीच बारामतीकरांनी अनुभवली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील तुकाराम खोमणे या शेतकऱ्याने आपल्या 'टायसन' नावाच्या बोकडाचा प्रथम वाढदिवस दणक्यात साजरा केला. इतकेच नव्हे तर या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेळीपालक व शेळीपालक तज्ज्ञांनी हजेरी लावली.
नवलच.. बारामतीत चक्क बोकडाचा केक कापून दणक्यात साजरा झाला वाढदिवस - बारामतीत बोकडाचा वाढदिवस
बारामतीत सध्या बोकडाच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील तुकाराम खोमणे या शेतकऱ्याने आपल्या 'टायसन' नावाच्या बोकडाचा प्रथम वाढदिवस दणक्यात साजरा केला.
बारामतीत चक्क बोकडाचा वाढदिवस
बोर ही दक्षिण आफ्रिकेतील मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या शेळीची जात आहे. 1992 साली पद्मश्री बन बिहारी विष्णुपंत निमकर यांनी बोरचा गर्भ आणून त्यांच्या फॉर्ममध्ये वाढविला. आता भारतभर बोर पसरत आहे. बोर ८० ते १५० किलोपर्यंत वाढू शकतात.
Last Updated : Jan 2, 2021, 10:10 PM IST