पुणे- लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला 6 लाख 50 हजार पेक्षा जास्त मते मिळतील याची खात्री होती आणि ते आपण आधीच लिहून ठेवले होते, असे सांगत गिरीश बापट यांनी आपल्याला आधीच मोठ्या मताधिक्क्याने विजयाची खात्री होती असे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर गिरीश बापट पत्रकार परिषदेत बोलत होते.
मोठ्या मताधिक्क्याने निवडून येईन हे मी आधीच लिहून ठेवले होते - गिरीश बापट - पुणे
गिरीश बापट यांनी त्यांना सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले, तसेच माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या संदर्भात देखील आभार व्यक्त केले. मात्र, गिरीश बापट यांच्या पत्रकार परिषदेसाठी पुण्यातील भाजपचे आमदार, पदाधिकारी उपस्थित असताना पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे मात्र उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता काकडे यांच्याबाबतची खदखद मात्र गिरीश बापट लपवू शकले नाहीत.
यावेळी बोलताना गिरीश बापट यांनी त्यांना सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले, तसेच माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या संदर्भात देखील आभार व्यक्त केले. मात्र, गिरीश बापट यांच्या पत्रकार परिषदेसाठी पुण्यातील भाजपचे आमदार, पदाधिकारी उपस्थित असताना पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे मात्र उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता काकडे यांच्याबाबतची खदखद मात्र गिरीश बापट लपवू शकले नाहीत. काकडे यांना खूप काम आहेत. त्यामुळे ते येऊ शकले नाही, असे खोचक उत्तर बापट यांनी दिले. त्याचवेळी कुणीतरी माझ्याबाबत गेल्या काही काळात ओरडत होते, मात्र याकडे मी लक्ष दिले नाही त्यामुळेच मला एवढं मताधिक्य मिळालं, असा टोला देखील त्यांनी लगावला.
संपूर्ण प्रचाराच्या काळात मी विरोधकांच्या विरोधात पातळी सोडून प्रचार केला नाही. मात्र, माझ्या विरोधात असलेल्या उमेदवाराने पातळी सोडून प्रचार केल्याने पुणेकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवली, असे देखील बापट या वेळी म्हणाले. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन पुण्याच्या विकासाची कामे करू, आपल्या नेतृत्वाखाली सर्वजण पुण्यात चांगले काम करतील असे सांगून गिरीश बापट यांनी आगामी काळात पुण्याचा कारभारी आपणच हे सूचित केले. त्यामुळे आगामी काळात पुणे जिल्ह्यातील भाजपवर गिरीश बापट यांचेच वर्चस्व राहणार याची चुणूक यानिमित्ताने दिसून आली आहे.