पुणे - शहरातील कर्वेनगर येथील मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीतील समोसे बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका उडाला. यामध्ये ४ मजूर गंभीर जखमी झाले. हा अपघात शेगडीला गॅस पुरवठा करणारी नळी निघाल्याने आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.
समोसा बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा उडाला भडका; ४ मजूर गंभीर - Cylinder
कर्वेनगर येथील मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीतील समोसे बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका उडाला. यामध्ये ४ मजूर गंभीर जखमी झाले.
पुणे
भालेकर एम्पायरच्या तळमजल्यावर समोसे बनवण्याच्या कारखाना आहे. या कारखान्यात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मजूर समोसे तयार करत होते. तेव्हा गॅस सिलेंडरची नळी निघाली आणि आगीचा भडका उडाला. या आगीत अन्नु चौहान याच्यासह ३ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.