महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात टोळक्याने एटीएम फोडून 8 लाख केले लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध चिखली पोलीस घेत आहेत. दरम्यान, एटीएम फोडून मोठी रक्कम लंपास करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली होती. त्यांच्याकडून 66 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. शहरात पुन्हा एटीएम मशीन फोडणाऱ्या चोरट्यानी डोके वर काढले असून पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे.

gang broke rbl bank atm and stole rs 8 lakh incident captured in cctv at pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात टोळक्याने एटीएम फोडून 8 लाख केले लंपास

By

Published : Oct 11, 2020, 9:38 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरात एटीएम फोडणाऱ्या चोरट्यानी पुन्हा डोके वर काढले असून चिखली परिसरातील अज्ञात चार जणांच्या टोळक्याने आरबीएल बँकेचे एटीएम गॅस कटरने कापले असून 7 लाख 99 हजार 900 रुपये घेऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात टोळक्याने एटीएम फोडून 8 लाख केले लंपास
या घटनेप्रकरणी अजय लक्ष्मण कुरणे (वय- 36 रा.आळंदीरोड, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करताच आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चारच्या सुमारास मोटारीतून आलेल्या अज्ञात चार चोरट्यानी चिखली तळवडे रोडवरील आरबीएल बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने जाळून कट करत त्यामधील तब्बल 7 लाख 99 हजार 900 रुपये घेऊन पोबारा केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली आहे. दरम्यान, ही बाब आज दुपारी अडीचच्या सुमारास बँकेच्या लक्ष्यात येताच पोलिसात धाव घेऊन अज्ञात चार जणांच्या टोळक्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार, चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध चिखली पोलीस घेत आहेत. दरम्यान, एटीएम फोडून मोठी रक्कम लंपास करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली होती. त्यांच्याकडून 66 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. शहरात पुन्हा एटीएम मशीन फोडणाऱ्या चोरट्यानी डोके वर काढले असून पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details