महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ganesh Visarjan २०२३ : श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं यंदा 6 तासांत विसर्जन; सार्वजनिक गणेशोत्सवात घालून दिला आदर्श - लक्ष्मी रस्त्यानं नेण्याचा निर्णय घे

Ganesh Visarjan २०२३ : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळानं दरवर्षी मिरवणूकीला हेणारा उशिर पाहता यंदा दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणूकीला सुरुवात केली. विशेष म्हणजे अवघ्या सहा तासांत मिरवणूक पूर्ण करत सार्वजनिक गणेशोत्सवात एकप्रकारे आदर्श घालून दिलाय.

Ganesh Visarjan 2023
Ganesh Visarjan 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 7:41 AM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं यंदा 6 तासांत विसर्जन

पुणे : Ganesh Visarjan २०२३ : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या 131 वर्षात प्रथमच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळानं दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे तो आमलात ही आणला. पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला ठीक 4 वाजता बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आणि 6 तासात आपल्या लाडक्या बाप्पाला पुणेकरांनी निरोप दिला. यंदा प्रथमच श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पाचं वेळेत विसर्जन झालं


पुणेकरांकडून मिरवणूकीचं ठिकठीकाणी स्वागत : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूकीला भर पावसात सुरुवात झाली. मिरवणूकीत श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. तसेच आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघाला होता. मिरवणूक मार्गावर ठिकठीकाणी पुणेकर नागरिकांकडून मोरया मोरयाच्या जयघोषात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा रथ अलका चौक मध्ये येताच नागरिकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी सर्वांनी आपल्या मोबाईलची टॉर्च सुरू करून मिरवणकीचं अनोखं स्वागत करण्यात आलं.


6 तासांत मिरवणूक पुर्ण : मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे पोलिस प्रशासनानं मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सुरु होत आलीय. परंतू, दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला होता. मागीलवर्षी तर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचं आगमन झालं होतं. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावं लागलं होतं. भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, त्यावेळी म्हणजे चार वाजेच्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुक लक्ष्मी रस्त्यानं नेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे यंदा चार वाजता विसर्जन मिरवणूक काढून 6 तासात ती पूर्ण करत एक आदर्श निर्माण केलाय.

हेहा वाचा :

  1. Ganesh Visarjan 2023: शिवरायांच्या उद्‌घोषात लालबागच्या राजाला भाविकांचा निरोप
  2. Ganesh Visarjan 2023: श्रीगणेशाच्या जयजयकारात दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणरायांना निरोप; पहा ड्रोन व्हिडिओ
  3. Ganesh Visarjan 2023: गणेशाच्या जयजयकारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाला दिला निरोप

ABOUT THE AUTHOR

...view details