महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ganesh Festival Preparations : गणपती उत्सवाची धुम धाम वाढली; ढोल ताशा पथकांची जोमाने तयारी - pune

महाराष्ट्राचा लोकप्रिय सण म्हणचे गणेशोत्सव (Ganesh Festival) होय. या सणाची वाट अगदी लहान चिमुकल्यांपासुन ते मोठ्यां पर्यत सगळेच आतुरतेने बघत असतात. गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा सण अनेक निर्बंधात साजरा केल्या गेला. मात्र यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव व निर्बंध कमी झाल्याने, पुणे (pune) येथील ढोल ताशा पथक जोमाने तयारीला (Ganesh Festival Preparations) लागली आहे.

नादब्रह्म ढोल ताशा पथक
नादब्रह्म ढोल ताशा पथक

By

Published : Jul 20, 2022, 6:14 PM IST

पुणे:गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वच सण -उत्सव हे निर्बंधात साजरे केले गेले. पण यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वच सण - उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे होत आहे. महाराष्ट्राचा आवडता सण असलेल्या गणेशोस्तवाला (Ganesh Festival) एक महिना उरला असल्याने पुणे शहरातील सर्वच छोट्या मोठ्या गणेशमंडळांनी (Ganesh Festival Preparations) जोरदार तयारीला सुरवात केली आहे. गणेशोत्सव म्हटले की, ढोल ताशा पथक हे आलेच. आणि यंदा देखील शहरात ठिकठिकाणी ढोल ताशा पथकांनी तयारीला सुरवात केली असून, यंदाच्या गणेशोत्सवाचा उत्साह सर्वच पथकांमध्ये दिसून येत आहे.

ढोल ताशा पथकाचा आढावा घेतांना प्रतिनिधी


2 वर्ष बंद होता ढोल ताशाचा गजर : गणेशोत्सव म्हटलं की ढोल ताशांचा गजर आलाच. गतवर्षी कोरोनामुळे सार्वजनिक मिरवणुकांवर बंदी होती. तसेच उत्सवावरही मर्यादा आल्या होत्या. सध्या दैनंदिन जीवन सुरळीत सुरू असून, वादनालाही परवानगी आहे. त्यामुळे उत्सवप्रेमी यंदाचा गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे. 2 वर्ष ढोल ताशा वाजवायला न मिळाल्याने यंदा मोठ्या उत्साहाने आणि जोरदार ढोल ताशा पथक हे तयारी करत आहे.


तरुणांसह लहान मुलांचा सहभाग :पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशा पथकाने एक ते दीड महिन्याआधीच तयारीला सर्वात केली. तरुण, तरुणी, महिला, बालक यांनी यावर्षी पथकात प्रवेश घेतला आहे. दोन वर्ष ढोल पथक वाजवायला न मिळाल्याने मोठया संख्येने वादक हे शहरातील ढोल ताशा पथकात सहभागी होत आहे. दोन वर्ष सर्वच सण उत्सव बंद असल्याने ढोल पथकात सहभागी होता आलं नाही, पण यंदा खूप छान वाटत असून उत्साह द्विगुणित झालेला आहे.


यंदा तरुणांमध्ये उत्साह : 'नादब्रह्म ढोलताशा ध्वज पथकाचा' सराव २६ जूनपासून छत्रपती राजाराम पुलाजवळ सुरू आहे. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती 'गुरुजी तालीम मंडळ', या गणपतीसाठी हे पथक वादन करत आले आहे. जुने व नवीन वादकांची संख्या मिळून ५५० इतकी झाली आहे. दहा दिवसांमध्ये विविध ठिकाणी वादन होते. अभिनेता सलमान खानच्या घरच्या गणपतीसाठी पथक मुंबईला जाऊन वादन करते. उत्सवासाठी वादकांचा सहभाग वाढला आहे. या मुळे यंदाच्या वर्षी नवीन तालात वादन करण्याचं ठरवलं आहे. आणि तशी तयारी देखील केली आहे, असे यावेळी पथकातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


पुण्यातून सुरवात :फार पूर्वी ‘एक-दोन-तीन-चार…गणपतीचा जयजयकार’ अशा घोषणा देत, श्रीगणेशाचे आगमन आणि विसर्जन दोन्ही पार पडायचे. मधल्या काळात डीजेचे वेड पसरले. पण अलीकडच्या काळात हा ट्रेण्ड कमी-अधिक प्रमाणात बदलताना दिसतोय. डीजेची जागा ढोलपथकांनी घेतली आहे. या ढोलताशा पथकांची सुरुवात सर्वप्रथम पुण्यात झाली. त्यापूर्वी गावागावांत सणासुदीला ढोल, ताशा आणि इतरही काही वाद्ये वाजवली जात होती. पुण्यात देखील मावळ येथून ढोल ताशा घेऊन मंडळी येत होती.पण काही वर्षांनंतर पुण्यात शालेय विद्यार्थ्यांचं शिस्तबद्ध आणि रुबाबदार ढोलपथकांमुळे पारंपरिक मिरवणुकीकडे सगळ्यांचा ओढा वाढला. आणि नंतर हळूहळू शालेय पथका नंतर बाहेरील पथकांना सुरवात झाली. आणि आज पुणे शहरात 80 पथके असून राज्यभरात 300 हून अधिक ढोल ताशा पथक आज कार्यरत आहेत.


जगभरात विविध ठिकाणी होत आहे वादन :पुण्यातून सुरवात झालेल्या या ढोल ताशांचा परंपरा आज देशभरात नव्हे, तर जगातील विविध देशांमध्ये जाऊन पोहचली आहे. जगभरातील विविध शहरांमध्ये ढोल ताशा पथकांना बोलावून त्यांचे वादन केले जातात.

हेही वाचा :Betel Leaves : खायच्या पानांचे सेवन केल्याने अनेक रोग आणि समस्यांपासून होते सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details