पुणे - जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर गणपतीच्या द्वारयात्रेची आज रविवारी समाप्ती झाली. सोमवारी २ तारखेपासून देशभरात श्री गणेशाचं आगमन होणार असल्याने या सोहळ्याची तयारी त्याआधीच ओझरमध्ये सुरु आहे.
अष्टविनायकातील एक ओझरच्या विघ्नहराच्या 'द्वारयात्रे'ची समाप्ती; उद्या होणार गणेशजन्मोत्सव सोहळा - विघ्नहर गणपती
अष्टविनायकातील एक ओझर गणेशाच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरु असून पेशवेकाळाच्या अगोदरपासून सुरु असलेल्या परंपरांचा वारसा जतन केला जात आहे.
ओझरच्या विघ्नहर
या सोहळ्याला अनेक भाविक दर्शनासाठी अनवानी चालत येतात. त्यामुळे या उत्सवाला वेगळेच महत्त्व आहे. सोमवारी याठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.