महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात यंदा विसर्जन मिरवणूक नाही, मंडपातच होणार बाप्पाचे विसर्जन

आज अनंत चतुर्थीने गणेशोत्सवाची सांगता होत आहे. आज दहा दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. यंदा कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने गणशोत्सव साजरा करण्यात आला. तसेच विसर्जन मिरवणूक देखील निघणार नाही. विसर्जनाची व्यवस्था गणपती मंडपातच करण्यात आली आहे. याबद्दल पुण्यातील मानाच्या 'कसबा' गणपतीजवळ आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी...

ganesh festival pune  ganesh festival 2020  corona effect on ganesh festival  गणेशोत्सव २०२०  गणेशोत्सवावर कोरोनाचा परिणाम  गणेश विसर्जन पुणे
पुण्यात यंदा विसर्जन मिरवणूक नाही, मंडपातच होणार बाप्पाचे विसर्जन

By

Published : Sep 1, 2020, 9:24 AM IST

पुणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. अगदी त्याच पद्धतीने विसर्जन सोहळा पार पडणार आहे. खरेतर दरवर्षी विसर्जन मिरवणूक म्हटलं की संपूर्ण शहरात उत्साह असतो. पुण्यातील प्रमुख लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या रस्त्यावर गणेशभक्तांची गर्दी असते. ढोल ताशांचा आवाज गर्जत असतो, सनईचे सूर निनादत असतात. मंगलमय वातावरण असते. मात्र, यंदा कोरोनामुळे हा उत्साह दिसून येत नाही. गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा बाप्पाचे विसर्जनही साध्या पद्धतीने होणार आहे. शहरात विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही. त्यामुळे मानाच्या प्रमुख मंडळासह इतर मंडळांनीही गणेशाच्या मंडपातच विसर्जन हौद तयार केले आहेत. त्या हौदातच बाप्पाचे विसर्जन होणार आहे.

पुण्यात यंदा विसर्जन मिरवणूक नाही, मंडपातच होणार बाप्पाचे विसर्जन

परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी १०.३० वाजता कसबा गणपतीला हार घालतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता पहिला मानाचा कसबा गणपतीचे विसर्जन होईल. दुसरा मानाचा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी १२.१५ वाजता, तिसरा मानाचा गुरुजी तालीमचा गणपती दुपारी १ वाजता, तर चौथा मानाचा श्री तुळशीबाग गणपती दुपारी १.४५ वाजता आणि पाचवा मानाचा केसरी वाडा गणपतीचे दुपारी २.३० वाजता विसर्जन होईल. त्यानंतर इतर महत्वाचे असलेले श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दुपारी ३.१५ वाजता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, ६:४७ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता अखिल मंडई मंडळाचा गणपती विसर्जन होईल.

घरगुती गणेश विसर्जनासाठी यंदा पुणे महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण १९१ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच ज्या नागरिकांस घरच्या घरी मूर्ती विसर्जन करणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या विसर्जन हौदांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details