महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Women's Day 2022 : महिला दिनानिमित्त मेट्रोतून कोरोना योद्धा महिलांना मोफत सफर - पिपरी- चिंचवड भाजप

पुण्यात नुकतीच मेट्रो सेवा सुरु झाली आहे. या मेट्रोची सफर कोरोना काळात काम करणाऱ्या महिलांना आज घडविण्यात ( Pimpari To Fugewadi Metro Journey ) आली. पिपरी- चिंचवड भाजपच्यावतीने ( Pipmari Chinchwad BJP ) जागतिक महिला दिनानिमित्ताने ( International Women's Day 2022 ) हा उपक्रम राबविण्यात आला.

महिला दिनानिमित्त मेट्रोतून कोरोना योद्धा महिलांना मोफत सफर
महिला दिनानिमित्त मेट्रोतून कोरोना योद्धा महिलांना मोफत सफर

By

Published : Mar 8, 2022, 8:59 PM IST

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्ताने ( International Women's Day 2022 ) आज भाजपा पिंपरी-चिंचवडच्या ( Pipmari Chinchwad BJP ) वतीने शहरातील कोरोना योद्ध्या महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर ( Pimpari To Fugewadi Metro Journey ) उपलब्ध करुन देण्यात आली. मेट्रोची पहिली सफर सकाळी सुरु करण्यात आली. शहरातील अनेक महिलांनी या सफरीचा आनंद घेतला आहे.

महिला दिनानिमित्त मेट्रोतून कोरोना योद्धा महिलांना मोफत सफर

महिलांना बांधले फेटे

महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह भाजपाच्या नगरसेविका देखील उपस्थित होत्या. पिंपरी- चिंचवडमध्ये आज महिलांना पुणे मेट्रोतून सफर घडविण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात सेवा देणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्यात आलं आहे. शहरातील महिलांना पिंपरी ते फुगेवाडी आणि परतीचा मेट्रो प्रवास आज दिवसभर करता आला. भाजपच्या महिला नगरसेविकांनी एकत्र येत कोरोना काळात महत्वाचं काम करणाऱ्या महिलांसाठी मेट्रोची मोफत सफर घडवली आहे. यामुळं करोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या, परिचारिका, डॉक्टर्स यासह इतर महिला कर्मचाऱ्यांना ही सुवर्णसंधी होती. नगरसेविका महिलांसह कोरोना योद्धा महिलांनी आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. सर्व, महिलांनी फेटा बांधून पिंपरी ते फुगेवाडी असा मेट्रोतून प्रवास केला.

ABOUT THE AUTHOR

...view details