पुणे- ऑनलाईन ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला चार ते पाच जणांच्या टोळक्याने दांडक्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील नळस्टॉप परिसरात घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. ही घटना शनिवारी रात्री घडली.
पुण्यात डिलिव्हरी बॉयला 5 जणांच्या टोळक्याने केली मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद - मारहाण
याप्रकरणी कुठलीही तक्रार दाखल नाही. परंतु सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक कल्पना जाधव यांनी सांगितले.
पुण्यात डिलिव्हरी बॉयला 5 जणांच्या टोळक्याने केली मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील नळस्टॉप परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या काही तरुणांनी ऑनलाईन फूड ऑर्डर केले होते. हे फूड घेऊन डिलिव्हरी बॉय आला होता. यावेळी त्यांच्यात काही वाद निर्माण झाला. त्यानंतर चार ते पाच तरुणांनी त्याला दंडुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल होत आहे.
याप्रकरणी कुठलीही तक्रार दाखल नाही. परंतु सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक कल्पना जाधव यांनी सांगितले.