पुणे- पोटी आलेली मुलगी जन्मदात्यांनाच नकोशी झाली आहे. चार ते सहा दिवसांपूर्वी जन्म घेतलेले स्त्री जातीचे अर्भक शिरूर तालुक्यातील निमोणे गावात जन्मदात्यांनीच सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बेवारस सोडून देण्यात आलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुन्हा नकोशी.! शिरूरमध्ये नवजात अर्भकला जन्मदात्यांनीच सोडले बेवारस
चार ते सहा दिवसांपुर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक शिरूर तालुक्यातील निमोणे गावात जन्मदात्यांनीच सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्यांनी नकोशी म्हणून सोडून दिलेल्या अर्भकाचा आवाज स्थानिक नागरिकांच्या कानावर पडताच मदतीचा हात पुढे करत या मुलीला प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जन्मदात्यांनी नकोशी म्हणून सोडून दिलेल्या अर्भकाचा आवाज स्थानिक नागरिकांच्या कानावर पडताच मदतीचे हात पुढे करत या मुलीला प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिरूर पोलिसांकडून अज्ञात जन्मदात्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार तिच्या आई-वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 'मुलगी वाचवा, देश वाचेल' असा नारा देशभरात दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात या संदेशाचे किती पालन केले जात आहे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. जन्मलेली मुलगी नकोशी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.