पुणे -राजगुरुनगर शहरालगत असणाऱया भिमानदीवरील केदारेश्वर बंधाऱयात एका तरुणाचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तरुणाच्या पाठीवर बाधलेल्या बँगमध्ये दगड आढळुन आल्याने तरुणाची आत्महत्या कि हत्या यामध्ये संभ्रम आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रुपेश विष्णुपंत बोऱहाडे असे तरुणाचे नाव आहे. रुपेश हा राजगुरुनगर भाजप शहर अध्यक्ष विष्णुपंत बोऱहाडे यांचा मुलगा आहे.
भिमानदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यात आढळला भाजप शहराध्यक्षाच्या मुलाचा मृतदेह, पाठीवरील बॅगमध्ये होते दगड - Kedareshwar building
आज सकाळच्या सुमारास काही नागरिक केदारेश्वर बंधाऱ्यावरुन जात असताना तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळुन आले. स्थानिक नागरिक, राजगुरुनगर नगरपरिषद व पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
भिमानदी वरील केदारेश्वर बंधाऱयावरुन राजगुरुनगर शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. सध्या हा बंधारा पाण्याने तुडुंब भरलेला आहे. आज सकाळच्या सुमारास काही नागरिक केदारेश्वर बंधाऱ्यावरुन जात असताना तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळुन आले. स्थानिक नागरिक, राजगुरुनगर नगरपरिषद व पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यावेळी रुपेशच्या पाठीवर बँग अडकवलेली आढळली. या बँगमध्ये दगड असल्याचे दिसून आले. यामुळे रुपेशने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हा संभ्रम निर्माण झाला आहे.