शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचा कोरोनाने मृत्यू - corona case in pune
माजी आमदार सुरेश गोरे यांना मागील दीड महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी काही काळ उपचाराला प्रतिसाद दिला. मात्र आज पहाटेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पुणे (राजगुरुनगर) - खेड आळंदी येथील शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
माजी आमदार सुरेश मोरे यांना मागील दीड महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानी काही काळ उपचाराला प्रतिसाद दिला. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून 2014मध्ये सुरेश गोरे हे शिवसेनेकडून विधानसभेवर गेले होते. मात्र यंदाच्या 2019मध्ये त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पराभव केला. पराभवाने खचून न जाता आमदार गोरे सक्रिय राहीले. खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शिवसैनिकांसोबत खांद्याला खांदा लावून गोरे काम करत होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आणि आज अखेर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.