पुणे - भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशामध्ये मतदान हा मोलाचा अधिकार आहे. म्हणून तो बजावणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी येथे दिली. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. प्रतिभाताई यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला. यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
मतदान मोलाचा अधिकार; तो बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य - प्रतिभाताई पाटील - pratibhatai patil casting her vote
जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. यामध्ये मतदान हा फार मोलाचा अधिकार आहे. त्यामुळे मतदानाचा हा पवित्र हक्क बजावणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दिली.
हेही वाचा -विधानसभा निवडणूक : यंदा मतदानाचा टक्का घसरला, अंदाजे ५६ टक्के मतदान
जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. यामध्ये मतदान हा फार मोलाचा अधिकार आहे. आणि देशातील संविधानाने सर्वांना समान मतदानाचा हक्क दिला आहे. देशातील स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत तसेच कोणत्याही जातीचा असो, अशा सर्वांच्या मताला संविधानानुसार सारखीच किंमत आहे. त्यामुळे मतदानाचा हा पवित्र हक्क बजावणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दिली. सोमवारी सायंकाळी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.