महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raju Shetti : महाविकास आघाडीच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक.. म्हणाले, 'आता चिरफाड करणार..'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Swabhimani Shetkari Sanghatana ) अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetti Against Mahavikas Aghadi ) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली ( Raju Shetti Criticized MVA ) आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेतले असून, त्या निर्णयांची चिरफाड करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक.. म्हणाले, 'आता चिरफाड करणार..'
महाविकास आघाडीच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक.. म्हणाले, 'आता चिरफाड करणार..'

By

Published : Mar 27, 2022, 3:42 PM IST

बारामती ( पुणे ) : कोल्हापूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ( Swabhimani Shetkari Sanghatana ) राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळाची चिकित्सक पद्धतीने मांडणी करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या कार्यकाळात जे शेतकरी विरोधी निर्णय घेण्यात आले आहेत, त्याची चिरफाड देखील यावेळी करण्यात ( Raju Shetti Against Mahavikas Aghadi ) येईल, अशा शब्दात माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यशासनावरील आपली नाराजी व्यक्त ( Raju Shetti Criticized MVA ) केली.


साखर कारखानदारांसमोर काही बोलणार नाही : बारामती येथील एका कार्यक्रमासाठी रविवारी (दि. 27) राजू शेट्टी उपस्थित राहिले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, भूमि अधिग्रहण कायदा दुरुस्ती करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याचा मोबदला 70 टक्‍क्‍यांनी कमी केला आहे. याचबरोबर ऊसाच्या एफआरपीचा मुद्दा, तसेच बाजार समितीमधून शेतकऱ्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा मुद्दा, असे अनेक मुद्दे आहेत. शासनाने ऊसदर नियंत्रण समिती गठीत केली आहे. मात्र ही ऊसदर नियंत्रण समिती अशा पद्धतीने गठीत करण्यात आली आहे की, या समितीमधील सदस्य साखर कारखानदारांना समोर काही बोलणार नाहीत. शासनाने दुबळी ऊसदर नियंत्रण समिती गठीत केली.

महाविकास आघाडीच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक.. म्हणाले, 'आता चिरफाड करणार..'

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : असे अनेक प्रश्‍न आम्ही घेणार आहोत. ज्या शेतकऱ्यांसाठीही महाविकासआघाडी निर्माण झाली त्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले आहेत का? असाही सवाल माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. अतिवृष्टीमध्ये 2019 च्या तुलनेत शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन देऊनसुद्धा राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली. मग हे नेमके शेतकऱ्यांचे सरकार म्हणायचे का काय म्हणायचे? या मुद्द्यांची सविस्तर चर्चा आम्ही करू व आमचा निर्णय घेऊ असेही यावेळी राजू शेट्टी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details