पुणे :सत्तासंघर्षानंतर राज्यात मोठी उलतापालथ पाहायाला मिळाली. शिवसेनेचे कट्टर नेते मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत जात, राज्यात नवं राज्य आणलं. त्यानंतर बंडासंदर्भात अनेक खुलासे झाले. नेमकं एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल का उचललं? यावर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिंदे यांच्या मनात उठावाचं बीज मीच पेरलं होतं, अशा गौप्यस्फोट (Former minister Vijay Shivtare secret blast) केला आहे.
कीर्ती पाठक यांची टिका : यावर आत्ता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray sisterinlaw Kirti Pathak) यांच्या आत्ते बहीण कीर्ती पाठक यांनी जोरदार टिका (Kirti Pathak strongly criticized Shivtare) केली आहे. 'विजय शिवतारे शिंदे गटातला सुपर गद्दार आहे. विजय शिवतारे यांनी त्याच्या पापाची कबुली दिली. आधी बापू म्हटलं की, कोकणातल्या गरीबीच्या बापूची आठवण यायची. आता आपल्याकडे एक निर्लज्ज असा पुरंदरचा बापू आहे. घरच्या महिलेला फसवत तीन लग्न करणारा, असा हा पुरंदरचा बापू आहे, असे म्हणत कीर्ती पाठक यांनी विजयबापू शिवतारेंना धारेवर धरत जोरदार टिका केली आहे. तर विजय शिवतारे यांना निवडणुकीत संपूर्णपणे गाडा असं आवाहन शिवसैनिकांना कीर्ती पाठक यांनी केलं आहे.