महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसला धक्का.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश - काँग्रेस

बुधवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार हर्षवर्धन पाटील

By

Published : Sep 10, 2019, 5:41 PM IST

Updated : Sep 10, 2019, 6:13 PM IST

पुणे- जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. बुधवारी दुपारी मुंबईत हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश

हेही वाचा - पवारांना सांगा पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे; चंद्रकांत पाटलांचा टोला

गेल्या काही काळापासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू होती. आगामी भूमिका काय असावी यासाठी पाटील यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या समर्थकांचा मेळावा देखील आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांच्या समर्थकांनी एकमुखाने भाजपमध्ये जाण्याची जोरदार मागणी केली होती. या मेळाव्यानंतर लवकरच आपण निर्णय घेऊ, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले होते.

हेही वाचा - भीमा-कोरेगाव: दिल्ली विद्यापीठाचे प्रा. हनी बाबूंच्या घरी पुणे पोलिसांचा छापा

हर्षवर्धन पाटील यांच्या या प्रवेशासाठी इंदापूर परिसरातील त्यांचे समर्थक मुंबईला जाण्याच्या तयारीत आहेत. आघाडीमध्ये इंदापूरची जागा कोणाकडे? यावरून वाद सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूर या जागेवर दावा सांगितला जात असल्याने हर्षवर्धन पाटील संभ्रमात होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळोवेळी आपली फसवणूक केल्याचे त्यांनी समर्थकांच्या मेळाव्यात म्हटले होते. लोकसभेच्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना मदत करण्याच्या बदल्यात इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडली जाईल, असे आश्वासन देऊनही आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी या मेळाव्यात सांगितले होते. त्यामुळे आता काँग्रेस सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी एक प्रकारे समर्थकांच्या माध्यमातून सांगितले होते.

हेही वाचा - पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इंदापूरच्या जागेबाबत अद्यापही काही बोलणे झालेले नाही. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील, असे सांगितले होते. मात्र, अखेर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Last Updated : Sep 10, 2019, 6:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details