महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून फुले, फळांचे प्रदर्शन, 'या'च्या वापराने नागरिकांमध्ये रोष - फुले, फळांचे प्रदर्शन पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे 25 व्या फुले, फळे, भाजीपाला बागांचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

pune
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून फुले, फळांचे प्रदर्शन, फुलदाणी म्हणून बिअरच्या बाटल्यांच्या वापरामुळे नागरिकांमध्ये रोष

By

Published : Feb 25, 2020, 5:21 PM IST

Updated : Feb 25, 2020, 6:01 PM IST

पुणे -पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे 25 व्या फुले, फळे, भाजीपाला बागांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. महानगरपालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या फुलांच्या आकर्षक सजावटी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून फुले, फळांचे प्रदर्शन, फुलदाणी म्हणून बिअरच्या बाटल्यांच्या वापरामुळे नागरिकांमध्ये रोष

महापालिकेच्या या प्रदर्शनाचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रदर्शनामध्ये बियरच्या रिकाम्या बाटल्यांपासून फुलदाण्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांचे लक्ष याकडे वेधले गेले. याचा विपरीत परिणाम मुलांवर होऊ शकतो असे प्रदर्शन पहाण्यासाठी आलेल्या नागरिकांनी म्हटले आहे. तर काही पर्यावरण प्रेमींनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची याप्रकरणी पाठराखण केली आहे. टाकाऊ बिअरच्या बाटल्यांपासून शोभिवंत वस्तू कशा बनवता येतील, यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. याकडे कलाकृतींकडे सकारत्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा -भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान

महापालिकेने आयोजित केलेले प्रदर्शन हे पर्यावरण प्रेमींना नक्कीच सुखावणारे आहे. परंतू फुलदाणी म्हणून वापरण्यात येणाऱ्या बिअरच्या बाटल्या वापरल्याने अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील प्रदर्शनात तरी अधिकाऱ्यांनी याची काळजी घेण्याची गरज आहे.

Last Updated : Feb 25, 2020, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details