महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात मुठा नदीला पूर, अनेक घरे पाण्याखाली

धरणांतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत शहराच्या विविध भागातील ६२५ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले आहे.

By

Published : Aug 4, 2019, 9:26 PM IST

पुण्यात अनेक घरे पाण्याखाली

पुणे - धरणांतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. शहराला पाणी पुरवठा करणा खडकवासला, वरसगाव, टेमघर, पानशेत ही चार धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात मागील नऊ दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे.

पुण्यात अनेक घरे पाण्याखाली

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील माहितीनुसार, आतापर्यंत शहराच्या विविध भागातील ६२५ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था स्थानिक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर केली आहे. पूराच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या भागांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले आहे. हे पथक महापालिकेच्या मुख्य इमारतीत तैनात राहणार आहे. गरजेच्या ठिकाणी हे पथक तत्काळ पाठविण्यात येणार आहे.

स्थलांतरित कुटुंबं -

१) आदर्शनगर, बोपोडी- २६० कुटुंब - राजेंद्र प्रसाद शाळा
२) शांती नगर येरवडा - ३०० कुटुंब- परुळेकर शाळा
३) कामगार पुतळा - १३ नागरिक- दहा नंबर शाळा
४) पाटील इस्टेट - पाच कुटुंब - घोले रस्ता पीएमसी कॉलनी शाळा शिवाजीनगर
५) खिलारे वस्ती- ५० कुटुंब - उपाध्याय शाळा.

ABOUT THE AUTHOR

...view details