पुणे- गणेश कला क्रीडा मंचमध्ये एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आयोजित ठिकाणी कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या १९ संशयित आरोपींचे पोस्टर लावण्यात आले आहे. एवढेच नाही तर परिषदेच्या मुख्य मंचावर देखील या सर्व आरोप असलेल्या कार्यकर्त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहे.
एल्गार परिषदेत झळकले कोरेगाव-भीमा दंगलीसंदर्भातील अटकेतील कार्यकर्त्यांचे पोस्टर
एल्गार परिषद ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसभराचा आढावा घेण्यासाठी दोन आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेला येणाऱ्या प्रत्येकाची ओळख कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली जात आहे.
एल्गार परिषद स्थळी झळकले कोरेगाव- भीमा दंगलीतील कार्यकर्त्यांचे पोस्टर
दोन आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती
दरम्यान या एल्गार परिषद ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसभराचा आढावा घेण्यासाठी दोन आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेला येणाऱ्या प्रत्येकाची ओळख कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली जात आहे. तसेच कार्यकर्त्यांना इतर कोणतेही सामान आतमध्ये नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
Last Updated : Jan 30, 2021, 12:55 PM IST