महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निगडीमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडित मुलींचे केले अपहरण - अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिपंरीचिंचवडमध्ये अल्ववयीन मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच पीडितेच्या बहिणीचाही विनयभंग झाल्याचे प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

निगडीमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
निगडीमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By

Published : Dec 17, 2020, 12:24 PM IST

पुणे -पिंपरी-चिंचवड शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचे आणि तिच्या मावस बहिणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या घटनेप्रकरणी करण भैरवनाथ साबळे (वय- 21), आशिष आनंद सरोदे (वय- 20), निवास संजय सुतार (वय- 20), तेजस राजू वाघमारे (वय- 19), कार्तिक उर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (वय- 21 सर्व रा. निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ओळखीचा फायदा घेऊन केला लौंगिक अत्याचार-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दोन्ही अल्पवयीन मुली त्यांच्या घराच्या परिसरात बोलत थांबल्या होत्या. आरोपी आशिष हा त्यांच्या तोंड ओळखीचा असून पीडित मुलीला बोलायचे आहे, असे म्हणून बाजूला घेऊन गेला. त्यानंतर निर्जळ स्थळी नेऊन तिच्यावर आरोपी आशिष आनंद सरोदे याने तिच्या इच्छेविरोधात लैंगिक अत्याचार केला. तर त्याच्या साथीदार भैरवनाथ साबळे याने पीडितेच्या मावस बहिणीचा विनयभंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

साथीदारांना बोलावून दोन्ही मावस बहिणींचे केले अपहरण-

दोन्ही आरोपी यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांना बोलवून दोन्ही मावस बहिणींचे अल्टो मोटारीतून अपहरण करून चिंचवड येथे नेले. मात्र, तिथून त्यांनी कसाबसा पळ काढून त्या राहत्या घरी पोहोचल्या. सर्व हकीकत आणि घडलेला प्रकार त्यांनी घरच्यांना सांगितला. अखेर निगडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली असून आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details